Chinchwad news: नगरसेवकांच्या तत्परतेने खासगी हॉस्पिटलला मिळाले ऑक्सिजनचे सिलेंडर!

ही बातमी शेअर करा.

Chinchwad news: नगरसेवकांच्या तत्परतेने खासगी हॉस्पिटलला मिळाले ऑक्सिजनचे सिलेंडर!
Pckhabar-हॉस्पिटलमध्ये 40 रुग्ण आणि त्यातील 13 ऑक्सिजनवर उपचार घेत असताना रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने नगरसेवक विकास डोळस यांना याबाबत कळविले. डोळस यांनी तत्काळ आयुक्तांशी संपर्क साधला आणि स्वतःही तिथे जात हॉस्पिटलला ऑक्सिजनचे 22 सिलेंडर भरून दिले.

वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. हॉस्पिटलमध्ये 40 रुग्ण असून त्यातील 13 ऑक्सिजनवर आहेत. तर पद्मजा हाॅस्पिटलचे दोन डॉक्टर अटकेत आहेत. रविवारी रात्री हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत आला होता. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाला काय करावे हे कळत नव्हते. नगरसेवक विकास डोळस आणि कुंदन गायकवाड यांना ऑक्सिजन संपत असल्याचा मॅसेज केला. डोळस आणि गायकवाड यांनी तत्काळ सूत्रे हालवत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला.

नगरसेवक डोळस म्हणाले, “वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलमधून ऑक्सिजनचे सिलेंडर संपायला आल्याचा व्हॉटसपवर मॅसेज आला होता. मदत करण्याची विनंती केली. हॉस्पिटलमध्ये 40 रुग्ण असून त्यातील 13 ऑक्सिजनवर असून ऑक्सिजन संपत आल्याचे सांगितले. तत्काळ आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांना फोन केला. त्यांनी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. आम्ही हॉस्पिटलला गेलो. सायन्स पार्क येथून 22 सिलेंडर भरून दिले. मी आणि नगरसेवक कुंदन गायकवाड ऑक्सिजनचे भरलेले सिलेंडर घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो”.


ही बातमी शेअर करा.