Sangvi News : महेश मंडळातर्फे आयोजित  शिबिरात 122 जणांचे रक्तदान

ही बातमी शेअर करा.

Sangvi News : महेश मंडळातर्फे आयोजित  शिबिरात 122 जणांचे रक्तदान

Pckhabar-दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसर महेश मंडळतर्फे  कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया व यांच्या स्मरणार्थ २३व्या रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले .


यावेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या  नगरसेविका शारदा सोनवणे, सतीश लोहिया, मनोज अटल, कुलदीप बजाज, गजानंद बिहाणी आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र  कार्य  केले. रक्तसंकलनसाठी पुणे  सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल , दीपेश मालानी , गणेश चरखा, तुषार चांडक, विवेक झंवर यांनी सहकार्य केले.


ही बातमी शेअर करा.