Talegaon Dabhade news: तळेगावातील आठवडे बाजाराचे ठिकाण पुन्हा बदलले

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade news: तळेगावातील आठवडे बाजाराचे ठिकाण पुन्हा बदलले
Pckhabar- तळेगाव दाभाडे शहरातील आठवडे बाजाराचे ठिकाण पुन्हा बदलण्यात आले आहे. हा बाजार संभाजीनगर रस्त्यावर पुन्हा सुरु होणार आहे. आता जिजामाता चौक परिसरात आठवडे बाजार भरत होता.मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 28 फेब्रुवारीचा तळेगावातील आठवडे बाजार होणार नाही.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सर्वंसाधारण सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या सभेत रविवारच्या आठवडे बाजाराची जागा बदलणे, नगर परिषदेच्या हद्दीलगतच्या गावांचा घनकचरा स्वीकारणे, तसेच काचराडेपोला चारही बाजूला रस्ते व विद्युतीकरण करण्याच्या महत्वपूर्ण ठरावांसह इतर २७ ठरावांना मंजुरी देण्यात आली.

२०१६ पुर्वी येथील संभाजीनगर रस्त्यावर आठवडे बाजार किशोर भेगडे यांनी सुरु केला होता. त्यानंतर भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी संभाजीनगर रस्त्यावर आठवडे बाजार बंद केले होता. परंतु आत्ता पुन्हा या सभेने या ठिकाणी आठवडे बाजार सुरु केल्याने आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे यांनी आभार मानले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २८ फेब्रुवारीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


ही बातमी शेअर करा.