PCMC News: बुद्धिबळ व कॅरम खेळास खेळाडु दत्तक योजनेत सामिल करून घ्या; युवक काँग्रेसची मागणी

PCMC News: बुद्धिबळ व कॅरम खेळास खेळाडु दत्तक योजनेत सामिल करून घ्या; युवक काँग्रेसची मागणी
  Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने सन 2012- 13 वर्षांपासून मनपा परिसरात राहणार्‍या विद्यार्थी खेळाडूंसाठी ’ खेळाडु दत्तक योजना’ सुरू केली आहे. या योजनेमध्ये अथेलिटिक, हॉकी, खो-खो, कबड्डी, बॉक्सिंग, नेमबाजी, क्रिकेट, जलतरण, कुस्ती लॉनटेनिस, बॅडमिंटन अशा 11 खेळांसाठी ही दत्तक योजना लागू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बुद्धिबळ व कॅरम या खेळास दत्तक योजनेमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक खेळाडूंनी बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेत प्राविण्य मिळविले आहे व आपल्या शहराचा नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळे या योजनेत बुद्धिबळ व कॅरम खेळास खेळाडू दत्तक योजनेत सामिल करून घ्या, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
     या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, सेवादलचे मकरधवज यादव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, पिंपरी विधान सभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विवेक भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.