Talegaon Dabhade news: सदभावना सायकल रँलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade news: सदभावना सायकल रँलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar-रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व आमदार सुनील शेळके फाँउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदभावना सायकल रँलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या रँलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  सकाळी ७ वाजता मारुती मंदिर चौकात पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सिनेअभिनेते जाँकि श्राफ, मावळचे आमदार सुनील शेळके, सीआरपी एफचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर.उप महानिरीक्षक बिपेंद्र टोपो, प्रांतपाल अनिल परमार, गणेश कुदळे, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, संस्थापक विलास काळोखे, अध्यक्ष संतोष शेळके आदींनी झेंडा व फुगे सोडून सदभावना यात्रेला सुरुवात केली.

यावेळी दीपक फल्ले, दिलीप पारेख, प्रदीप टेकवडे, मनोज ढमाले, दादासाहेब उ–हे, किरण ओसवाल, बाळासाहेब रिकामे, शरयू देवळे, वैशाली खळदे आदीसह सर्व विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.

हि सदभावना सायकल रँली गावाभागातून तळेगाव स्टेशन वरून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी तिचा समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी झालेल्या प्रत्येकाला टीशर्ट, टोपी, व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.


ही बातमी शेअर करा.