Maval news: मावळवासियांकडून जबरदस्तीने सुरू असलेली टोल वसुली बंद करा; अन्यथा तीव्र आंदोलन

ही बातमी शेअर करा.

Maval news: मावळवासियांकडून जबरदस्तीने सुरू असलेली टोल वसुली बंद करा; अन्यथा तीव्र आंदोलन
Pckhabar-जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर स्थानिक मावळ वासियांची टोल आकारणी बंद करावी. अशी मागणी सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी लेखी निवेदनाव्दारे तळेगाव दाभाडे पोलिसात केली. मागणी मान्य न झाल्यास 21 फेब्रुवारी रोजी सोमाटणे टोल नाक्यावर तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाऱा या निवेदनाव्दारे देण्यात आला.

सुमारे पंधरा वर्षापूर्वी जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर आयआरबी कंपनीने सोमाटणे टोलनाका सुरु केला आहे. या टोलनाक्यावर स्थानिक मावळवासियाकडून जबरदस्तीने टोल वसुली केली जाते. केंद्र शासनाने या टोल नाक्याला देहूरोडच्या हद्दीत भक्ती शक्ती जवळ परवानगी दिली होती. मात्र आयआरबी कंपनीने तेथे न बांधता तो सोमाटणे येथे बांधलेला आहे. चुकीच्या ठिकाणावरून गेली 15 वर्ष टोल वसुली केली जात आहे. ती त्वरित बंद करावी. यासाठी सर्व पक्षीयांनी कंबर कसली आहे. असून शनिवारी सर्वांनी एकत्र येऊन तळेगाव दाभाडे पोलिसांचे मार्फत आयआरबी कंपनीस निवेदन दिले.
तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या कार्यालयात जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, तळेगाव शहर विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गणेश भेगडे, गटनेते अमोल शेटे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, शिवसेनेचे मुन्ना मोरे, आरपीआईचे सुनील पवार, मनसेचे सचिन भांडवलकर, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, मिलिंद अच्युत, काँग्रेस आयचे विशाल वाळूंज, नगरसेवक निखील भगत, सुनील कारंडे, विनोद भेगडे तर आय आयआरबीचे सोमाटणे टोल नाक्याचे व्यवस्थापक वामनराव राठोड व अधिकारी उपस्थित होते.
सोमाटणे टोलनाक्याच्या टोल वसुलीबाबत येत्या मंगळवारी आयआरबी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. जर या बैठकीत समाधानकारक निर्णय झाला नाहीतर सर्व पक्षीय आंदोलन करण्यात येईल.

संपूर्ण जिल्ह्यातून टोल वसुली बंद करावी. तसेच एमएच-14 आणि एमएच 12 या पासिंगच्या सर्व गाड्यांना जिल्ह्यामधील सर्व टोल नाक्यारून टोल माफ करावा, अशी मागणी गणेश भेगडे यांनी केली.


ही बातमी शेअर करा.