Talegaon Dabhade news: स्थानिकांच्या वाहनांना टोल माफ करा, अन्यथा जनआंदोलन

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade news: स्थानिकांच्या वाहनांना टोल माफ करा, अन्यथा जनआंदोलन
Pckhabar- स्थानिक नागरिकांच्या वाहनांना सोमाटणे टोल नाक्यावर टोल माफ करावा. अन्यथा आठ दिवसानंतर सर्व पक्षीय जनआंदोलन,  करण्यात येईल असा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिला.

सोमाटणे टोलनाका येथे स्थानिक नागरिकांच्या वाहनांना टोलमध्ये   माफी मिळावी यासाठी शनिवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचना आवारे, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते अमोल शेटे यांनी आय आर बी टोल नाका व्यवस्थापनाचे वामन राठोड यांना निवेदन दिले.

यावेळी शिक्षण समितीच्या सभापती अनिता पवार, नगरसेवक निखिल भगत, माजी नगरसेवक सुनील कारंडे, कल्पेश भगत, मिलींद अच्युत, अनिल पवार यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या आठ दिवसात स्थानिक नागरिकांच्या वाहनांचा टोल माफ झाला नाही तर आठ दिवसानंतर सर्वपक्षीय जनआंदोलन आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. त्याला सर्वस्वी आयआरबी कंपनी जबाबदार असेल, इशारा आंदोलकांनी दिला.


ही बातमी शेअर करा.