Nigdi crime news: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पाच जणांना अटक
Pckhabar-अल्पवयीन मुलीला अंधारात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलीच्या मावस बहिणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर दोन्ही मुलींचे अपहरण केले. हा प्रकार निगडी परिसरात घडला. याबाबत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
करण भैरवनाथ साबळे (वय 21), आशिष आनंद सरोदे (वय 20), निवास संजय सुतार (वय 20), तेजस राजू वाघमारे (वय 19), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय 21, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला अंधारात नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तिथे पीडित मुलीची मावस बहीण आली असता आरोपी करण याने तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी करण आणि आशिष या दोघांनी अन्य आरोपी निवास, तेजस आणि कार्तिक या तिघांना बोलावून घेतले. सर्व आरोपींनी मिळून दोन्ही मुलींना लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये जबरदस्तीने बसवून चिंचवड स्टेशन येथे नेले. याबाबत पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे.
Nigdi crime news: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पाच जणांना अटक










Leave a Reply