Khadki news: खडकी कँटोन्मेंट बोर्ड आर्थिक संकटात
Pckhabar- कोरोना महामारीसहित सेवा शुल्क पोटीचे थाकित 107 कोटी रुपये तसेच उत्पन्नाचे मार्ग कमी असल्याने खडकी कँन्टोन्मेंट बोर्डास सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कँन्टोन्मेंट बोर्डा ची एफ.डी.ची रक्कम ही संपुष्ठात आल्याने पुढील महिन्यातीला (जानेवारी) कर्मचारी वेतन व सेवा निवृत्त कर्मचार्यांची पेंशन देणे ही कँन्टोन्मेंट प्रशासनास अवघड बनले आहे.
कोरोना संकटामुळे देशासह राज्यास तसेच शहरास ही त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. कँन्टोन्मेंट बोर्ड ही या समस्येचा सामना करित आहेत. खडकी कँन्टोन्मेंट हद्दीतील जकातीच्या माध्यमातुन प्राप्त होणारा कोट्यावधी रुपयांचा महसुल बंद झाल्याने एल बी.टी, व जी.एस, टी.चा हिस्सा न मिळाल्याने तसेच अँम्युनिशन फँक्टरी रेल्वे पोस्ट बी.एस.एन.एल. यांच्याकडील अनेक वर्षापासुन थकित असलेला 107 कोटी रुपयांचा थकित सेवा शुल्करुपी रक्कम अद्याप प्राप्त न झाल्याने सध्या खडकी कँन्टोन्मेंट बोर्डवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. डिसेंबर महिन्यातील कर्मचारी वेतन व सेवा निवृत्तांची पेंशन देताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. कँन्टोन्मेंट बोर्डाची सुरक्षित अशी एफ.डी.ची रक्कम संपल्याने जानेवारी महिन्यातील कर्मचारी वेतन व सेवा निव्रुत्तांची पेंशन सहित कन्त्राटी पध्दतीने काम करित असलेल्या कर्मचार्यांचे वेतन कोठुन व कशा पध्दतीने देणार या चितेंत प्रशासन आहे.
कँन्टोन्मेंट बोर्डास प्रति महिना कर्मचारी वेतन पोटी 2 कोटी 50 हजार सेवा निवृत्त पेंशन वाटप पोटी 1 कोटी 10 लाख तर कंत्राटी पध्दतीने काम करणार्या कर्मचारी यांच्या वेतनापोटी 1 कोटी 25 लाख असे एकुन दर महिन्यास साधारणपणे 4 कोटी 85 लाख खर्च येतो. कोट्यावधी रुपयांचा थकीत सेवा शुल्क सह अन्य ईतर महसुलरुपी निधींची तरतुद न झाल्यास जानेवारी महिन्यातीला कर्मचारी वेतन व सेवा निवृत्तांची पेंशन देणे प्रशासनास कठीण बनेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग म्हणाले की कँन्टोन्मेंट सध्या आर्थिक संटातुन जात आहे. मात्र लवकरच त्यातुन बोर्ड बाहेर पडेल. फँक्टरी रेल्वे पोस्ट तसेच बीएसएन एलकडील कोट्यावधी रुपयांचा थकित सेवा शुल्क मिळण्याबाबत प्रयत्न चालु आहेत. उत्पन्नाचे नविन मार्ग शोधण्यासंबधी ही प्रयत्न सुरु आहेत. लवकरच या आर्थिक संकटातुन कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Khadki news: खडकी कँटोन्मेंट बोर्ड आर्थिक संकटात










Leave a Reply