Dehu news : अखेर देहूगावात नगरपंचायत!
Pckhabar- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेल्या देहूगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायत मध्ये झाले आहे.
देहूगाव येथील ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. देहूगावचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी होत होती. मात्र, याला देहूगावकरांनी तीव्र विरोध केला होता.
तीर्थक्षेत्र देहूगावची सुमारे 35 हजार लोकसंख्या आहे. वाढती लोकसंख्या आणि श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त येतात. नागरी सुविधांचा विचार करता ग्रामपंचायतची नगरपंचायतींमध्ये रुपांतर करण्याची मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपंचायत करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला आहे.










Leave a Reply