Maharashtra news: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक

ही बातमी शेअर करा.

Maharashtra news: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाणांची विजयी हॅटट्रिक
Pckhabar- मराठवाडा पदवीधर मतदरासंघ निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस होईल अशी शक्यता होती, परंतु पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिली पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते देत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्याने विजयी केले, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली.

चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली विजयी आघाडी पाचव्या फेरीअखेर कायम ठेवली, ३५ उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार बोराळकर यांच्यात मुख्य लढत झाली, दुसऱ्या फेरी अंतीच चव्हाणांची विजयाकडे घौडदौड दिसून आली, सुमारे २० तास मतमोजणी सुरू होती.

चौथ्या फेरीअखेरीस चव्हाण यांना १ लाख ७ हजार ९१६ मते तर भाजपाचे उमेदवार बोराळकर यांना ५४ हजार ३०५ मते मिळाली, या फेरीअखेरीस २१ हजार ३८८ मते बाद झाली, चौथ्या फेरीअखेर २ लाख २५ हजार ७४ मतांची मोजणी झाली, एकूण २ लाख ४० हजार मतदान झाले होते.


ही बातमी शेअर करा.