Pune news: जम्बो मतपत्रिकेमुळे मतमोजणीस होतोय उशीर
Pckhabar-: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. दोन्ही पैकी पदवीधर मतदार संघात सर्वाधिक ६२ उमेदवार असल्याने ‘जम्बो’ मतपत्रिका झाली आहेत. त्यामुळे मतपत्रिका एकत्र करणे, वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या करणे, कोटा निश्चित करणे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास सायंकाळ होणार आहे. तर, प्रत्यक्ष मतमोजणीस रात्री ८ वाजेपर्यंत कालावधी लागणार असल्याचा अंदाज उपस्थित अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणीच्या प्रक्रियेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. तत्पूर्वी विभागीय आयुक्त सौरव राव आणि सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतमोजणी ठिकाणी उपस्थित राहून सर्व पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना देऊन मतपेट्या पाचही जिल्ह्यानुसार प्रत्यक्ष खीलाण्यास अनुमती दिली. पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार तर शिक्षक मतदारसंघामध्ये ३५ उमेदवार आहेत. मतपत्रिका एकत्र करण्याच्या प्रक्रियेला सकाळी १०.३० वाजता सर्वात करण्यात आली. साध्य स्थितीला वैद्य अवैध मतपत्रिका काढण्याचे काम सुरू आहे. वैद्य मतपत्रिका ची संख्या निश्चित केल्यानंतर उमेदवारांना निवडून येण्यासाठीच्या पहिल्या पसंतीसाठी मतांचा कोटा निश्चित केला जाणार आहे. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड तर भाजप तर्फे संग्राम देशमुख यांच्यामध्ये चुरस पहावयास मिळणार आहे. तर शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, मनसेचे विद्यानंद मानकर, लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात, अपक्ष उमेदवार संतोष फासगे यांच्यात चुरस होणार असल्याचे बोलले जात आहे. मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदार संघासाठी सहा हॉल तयार करण्यात आहेत. त्यानुसार प्रत्येक हॉलमध्ये सात टेबल ठेवण्यात आले आहेत. पदवीधर मतदार संघासाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ४५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याने क्रीडा संकुलामध्ये मोठ्या प्रमाणात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.










Leave a Reply