Pimpri smart citi news: स्मार्ट सिटी रँकींगमध्ये शहराचा राज्यात दुसरा क्रमांक

Pimpri smart citi news: स्मार्ट सिटी रँकींगमध्ये शहराचा राज्यात दुसरा क्रमांक
Pckhabar-  स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने दुस-या स्थानी झेप घेतली आहे. तर, पुणे शहराचा पहिला क्रमांक आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन ही रँकींग देण्यात आली.

याबाबतची माहिती देताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. कोरोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू होती.  प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील नऊ शहरात पिंपरी-चिंचवडने दुस-या क्रमाकांवर झेप घेतली असून ही सुधारणा शहराला चालणा देणारी आहे.

शहरातील सर्व कामांच्या निविदा झाल्या आहेत. कामे सुरु आहेत. त्यामुळे शहराचा रँकींगमध्ये नंबर वाढत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी साडेतीनशे कोटीच्या आसपास खर्च झाला आहे. सर्व कामे चालू आहेत. त्यामुळे खर्च होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *