Sangvi news: महेश मंडळातर्फे ‘त्रयोदश अन्नकोट’ महोत्सव

Sangvi news: महेश मंडळातर्फे ‘त्रयोदश अन्नकोट’ महोत्सव
Pckhabar-कोरोना मुळे समाज सुरक्षित राहणे पण गरजेचे आहे. समाजाची परंपरा पण जिवंत ठेऊन आपली संस्कृतीचे जतन  होणे गरजेचे आहे, अशी पवित्र भावना ठेऊन सांगवी परिसर महेश मंडळा तर्फे “त्रयोदश अन्नकोट  महोत्सव व दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे एक आगळे वेगळे स्वरूपात आयोजन करण्यात आले.

महिला समितीच्या महिलांनी छपन्न भोग सजावट  केल्यांनतर  मंडळाच्या मोजक्याच पदाधिकार्यांच्या  उपस्थितीत  महादेव व श्रीकृष्णाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले. सर्व समाजबांधवांनी फेसबुकच्या माध्यमातून आरतीचा लाभ घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ३०० हुन अधिक  समाजबांधवांच्या घरी जाऊन अन्नकुट प्रसाद वाटप केले.

या प्रसंगी जर ध्येयात पवित्रता, नेतृत्वात निर्णयक्षमता, कुशल कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि समाजाची एकता असेल तर कोणतीही शक्ती संघटनला रोखू शकत नाही. समुदयाची ताकद प्रत्येक संकटावर भारी पडते, मग भले हि कोरोना सारखी संकटे असू द्या  असे प्रतिपादन सतीश लोहिया यांनी केले. सर्व समाजबांधवाच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांमुळे यशस्वी पार पडला.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)