Maharashtra news : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘योद्धा @ 80’ शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने ‘योद्धा @ 80’ शॉर्टफिल्म स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. ही शॉर्टफिल्म स्पर्धा पवार यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीची माहिती लघुपटाच्या माध्यमातून तरूण पिढीपर्यंत पोहोचावी व फिल्म मेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक-युवतींकडून शरद पवार यांच्या कारकिर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये एक लाख पारितोषिक ठेवले आहे.
द्वितीय पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रु.७५,००० तर तिसरे पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रु.५०,००० याप्रमाणे असणार आहे. याशिवाय काही विशेष पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचा निकाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच दि. १२ डिसेंबर रोजी जाहीर होईल.
यासाठी पवार यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दर्शविणाऱ्या विषयांवर शॉर्टफिल्म तयार करणे अपेक्षित आहे.

स्पर्धकांनी महिला विकासात
शरद पवार यांचे योगदान, फुले-शाहू-आंबेडकर : पुरोगामी विचारांचे पाईक मा. शरद पवार, मा. शरद पवार साहेबांचे कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योगदान, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मा. शरद पवार यांचे योगदान, कला-साहित्य-संस्कृती : रसिकाग्रणी मा. शरद पवार,क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ : मा. शरद पवार , आपतकालीन नैसर्गिक प्रसंगातील संकटमोचक : मा. शरद पवार, महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संस्थात्मक उभारणीचे आधारस्तंभ : मा. शरद पवार लोक माझे सांगाती : मा. शरद पवार, मा.शरद पवार : एक समग्रदर्शन या विषयांवर शॉर्टफिल्म तयार करावी.

अधिक माहितीसाठी
महेश हरबक – 9834602449,
सुबोध जाधव – 9823067879 ,
सागर राऊत – 7972937993 यांना संपर्क साधावा. प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या दोन्ही वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
दि. १२ नोव्हेंबर २०२० रोजी पासून ०५ डिसेंबर २०२० पर्यंत स्पर्धकांना स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविता येतील कृपया याची नोंद घ्यावी.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply