Maharashtra news : शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच्या मदतीची घोषणा, दिवाळी आधी खात्यावर पैसे जमा होणार- उद्धव ठाकरे

Maharashtra news : शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच्या मदतीची घोषणा, दिवाळी आधी खात्यावर पैसे जमा होणार- उद्धव ठाकरे
Pckhabar- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत दिली जाईल असं ते म्हणाले. केंद्र सरकारचे निकष आहे त्यापेक्षा जास्त मदत देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवाळी आधी ही मदत पोहोचेल. हे पैसे कसे उभे करायचे त्याचा विचार सुरू असून कर्ज घ्यावं लागलं तर तेही घेऊ असंही ते म्हणाले. हेक्टरला 10 हजार रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे 38 हजार कोटी येणं बाकी आहे. ते पैसे मिळावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारचं पथक राज्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र अजुनही ते पथक आलेलं नाही. केंद्राने दुजाभाव करू नये असंही ते म्हणाले.

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *