Crime news : इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा; 14 जणांवर गुन्हा
Pckhabar-येलवाडी, देहूगाव येथे इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल घोगरे, सागर गोरे, निलू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), दिनेश बलदानी आणि इतर दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली की, म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत येलवाडी, देहूगाव येथे इंद्रायणी नदीकाठी काहीजण मटका अड्डा चालवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा मारला. मटका अड्डा चालक मालक अनिल घोगरे, सागर गोरे हे दोघे लोकांची गर्दी करून कल्याण मटका जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 51 हजार 330 रुपयांची रोख रक्कम, 18 हजार 20 रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य आणि मोबाईल फोन असा एकूण 69 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे यांच्या पथकाने केली.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)















Leave a Reply