देहूगाव, झेंडेमळ्यातील बंगल्यात चोरी; नऊ लाखांचा ऐवज लंपास

देहूगाव, झेंडेमळ्यातील बंगल्यात चोरी; नऊ लाखांचा ऐवज लंपास
Pckhabar- देहूगाव, झेंडेमळा येथील एका बंगल्यात चोरी करून अज्ञात चोरट्यांनी 28 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड एकूण 9 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी महेंद्र साहेबराव झेंडे (वय-38, रा. झेंडेमळा, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झेंडे यांचा देहुगावातील झेंडेमळ्यात बंगला आहे. त्यांचा बंगला कुलूप लाऊन बंद होता. शनिवारी सायंकाळी साडेसह ते रात्री नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला. बंगल्यातून 28.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 9 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *