देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्या पाचशेच्या जवळ, 16 नवे रुग्ण
Pckhabar -देहूगाव परिसरात कोरोना रूग्ण संख्या पाचशेच्या जवळ गेली आहे. शनिवारी 16 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 496 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 361 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
124 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 87 रूग्णांना लक्षणे नसून 37 रुग्णांना लक्षणे आहेत. 36 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 65 रुग्ण उपचार घेत आहेत.















Leave a Reply