कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य भास्कर बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
Pckhabar- कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य भास्कर बोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूगाव आणि परिसरातील यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचा सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु.उढाण प्रेरणा पाराजी-99 टक्के, द्वितीय क्रमांक- कु. गाडे सायली संतोष-94 टक्के, तृतीय क्रमांक -कु. विधाटे गौरी मनोहर-93.40 टक्के, चौथा क्रमांक – कु. गायकवाड श्रेया रवींद्र-93.20 टक्के तर कु. कागणे निकिता अशोक हिने पाचवा क्रमांक पटकावित 92 टक्के मिळविले. या सर्व यशस्वी विद्यार्थीर्ंंनींचा यांचा सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर मुलांमध्ये प्रथम आलेल्या गाडे आयुष संतोष 98.20 टक्के, द्वितीय जुंद्रे सुदर्शन अविनाश 95.20 टक्के, तृतीय पाटील रुद्रसिंह अभयसिंह 94.80 टक्के, चौथा भोगाडे गौरव पोपट 94.20 टक्के, पाचवा मासाळ आदित्य रमेश 93 टक्के यांचाही सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी सर्व यशस्वी पाल्याचे पालकही आवर्जून उपस्थित होते.
कर्तव्य फाऊंडेशनचे सर्व सदस्य सामाजिक बांधिलकी जोपासत आपले वाढदिवस साजरे करत असतात.















Leave a Reply