देहूगाव परिसरात कोरोनाचे 8 नवे रुग्ण, 4 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- देहूगाव परिसरात सोमवारी कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूत आजपर्यंत 273 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 197 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 70 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी ताप, सर्दीसह अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा. सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांनी मास्क ओला होऊ नये याची खबरदारी घ्यावी. ओला मास्क न घालता एक अतिरिक्त मास्क जवळ ठेवावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.















Leave a Reply