Pimpri News: “स्कील डेव्हलपमेंट” उपक्रमात चौदा नवीन अभ्यासक्रमांचा समावेश : आयुक्त राजेश पाटील

Pimpri News: “स्कील डेव्हलपमेंट” उपक्रमात चौदा नवीन अभ्यासक्रमांचा समावेश : आयुक्त राजेश पाटील

रोजगार कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठीचा अभ्यासक्रम महत्वपूर्ण ठरणार
Pckhabar-“स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह”च्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट अंतर्गत चौदा नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‍पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या मार्फत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी “स्कील डेव्हलपमेंट” अंतर्गत सामंजन्स करार करण्यात आलेला असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी नवनवीन कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठीचा हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हददीतील अभियांत्रिकी, पदवीधर, विद्यार्थी, युवकांना पूर्ण वेळ रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याच्या हेतूने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये (SAP Careers ABAP), (SAP Careers MM), (Microsoft Cloud Admin), (Linux Administration) या चार कोर्सचा समावेश करण्यात आलेला होता. इंजिनिअरींग, डिप्लोमा आण‍ि कुठल्याही शाखेतून पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे. तर, मशीन लर्नींग एक्सपर्ट (Machine Learning Expert), बिग डेटा हडूप ऍन्ड स्पार्क डेव्हलपमेंट एक्सपर्ट (Big Data Hadoop and Spark Development Expert), डेटा सायन्स विथ पायथन एक्सपर्ट (Data Science with Python Expert), डेटा सायन्य विथ आर प्रोग्रमिंग एक्सपर्ट (Data Science with R Programming Expert), गुगल एडवर्ड एक्सपर्ट (Google Adwords Expert), सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन एक्सपर्ट (Search Engine Optimization Expert), सोशल मिडीया एक्सपर्ट (Social Media Expert), टेस्ट ऍटोमेशन विथ सिलेनिअम एक्सपर्ट (Test automation with Selenium Expert), एँगुलर डेव्हलपमेंट एक्सपर्ट (Angular Development Expert), जावा विथ स्प्रींग डेव्हलपमेंट एक्सपर्ट (Java with Spring Development Expert), पॉवर बीएल एक्सपर्ट (Power BI Expert), टॅब्लेऊ एक्सपर्ट (Tableau Expert), मायक्रोसॉफ्ट एझुर ऍडमिनीट्रेशन एक्सपर्ट ( Microsoft Azure Administration Expert), एडब्लुएस सोल्युशन आर्कीटेक्टर एक्सपर्ट (AWS Solutions Architecture Expert), हे चौदा नवीन कोर्स शहरातील विद्यार्थ्यांसाठी माफक दरात उपलब्ध करण्यात आलेले असून एका कोर्ससाठी र.रु.१२,७४४/- इतकी फी आकारली जाणार आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉडयूल तयार करणे, हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उददेश्य आहे. आजच्या डिजीटल युगात ऑनलाइन माध्यमातून रोजगारनिर्मीती होत आहे. यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टिक) द्वारे सुरु करण्यात आलेला उपक्रमाकडे एक व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे. “इंडस्ट्री ४.०” हे ध्येय डोळयासमोर ठेवत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन” सेंटर स्थापन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच काळानुसार अद्ययावत ज्ञान देण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन सेंटर (स्टिक) व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत कायम राहावे, यासाठी “स्ट‍िक” माध्यमातून कौशल्ये अभ्यासक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उभारलेल्या संधीचा विद्यार्थी, युवकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.sticonline.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेली आहे, असेही आयुक्त‍ तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी सांगितले.