Maval News : श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Pckhabar- भाजे येथील विद्या प्रसारिणी सभेचे श्रीमती . शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात “जागतिक महिला दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी आनंदाने सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. शिरसाट सर, बनकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मनोहर भोसले सरांनी केले. प्राचार्या क्षीरसागर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक विभागाच्या मुखाध्यापिका सौ . रगडे मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास श्री. गायकवाड सर, श्री .पथवे सर ( केंद्रप्रमुख भाजे केंद्र ) श्री . नामदेव कडू, श्री . रजपूत यांचे सहकार्य लाभले . अध्यक्षिय भाषण सौ. जगताप मॅडम यांनी केले. तर सर्व मदत ,सहकार्य व आभार प्रदर्शन श्री .कोठावदे सर यांनी केले .










Leave a Reply