Dehugaon Sad News : कौसल्या दत्तात्रय मोरे यांचे निधन

Dehugaon Sad News : कौसल्या दत्तात्रय मोरे यांचे निधन

Pckhabar- देहूतील ज्येष्ठ महिला सौ.कौसल्या दत्तात्रय मोरे (इनामदार) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७२व्या वर्षी गुरुवार, दि.१३जानेवारी२०२२ रोजी पहाटे ३ वाजता निधन झाले.

त्यांच्यामागे पती श्री दत्तात्रय मोरे, मुलगा ह.भ.प.पुरुषोत्तम मोरे, सौ.अंजना सिताराम गोळे, सौ.लक्ष्मी बाळासाहेब ठाकूर या दोन मुली व नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांचे चिरंजीव ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज हे तळेगाव दाभाडे येथील कांतीलाल शहा विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच या परिवाराकडे ज्या आनंद डोहात संत तुकोबारायांच्या गाथा बुडविल्यानंतर १३ दिवसांनंतर तरल्या त्या मूळ गाथा मंदिराची पूजा सेवा असल्याकारणाने ही पूजासेवा करण्याचे भाग्य सौ.कौसल्या मोरे यांना लाभले. आईचा हाच वसा आणि वारसा जोपासत ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज महाराष्ट्रभर आपली कीर्तन व प्रवचन सेवा देत आहेत.
तसेच जगद्गुरू संत तुकोबाराय जन्मोत्सव सोहळा, पालखी सोहळा, वैकुंठगमन सोहळाच्या निमित्ताने आनंद डोह मंदिरात कीर्तन सेवा संपन्न होत असते. श्रीक्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर येथील माऊलींची सेवा विठ्ठल महाराज देहूकर फडामार्फत किर्तन सेवा करीत असतात. या परिवाराच्या परंपरेनुसार मूळ गाथा मंदिराची सेवा त्यांच्या सुनबाई सौ.रेणुका मोरे पाहत आहेत. दशक्रिया विधी सोमवार, दि.१७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता देहू येथील इंद्रायणी काठी संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *