देहूगावात कोरोनाच्या 10 रुग्णांना डिस्चार्ज, 4 नवे रूग्ण
Pckhabar- देहूगावात बुधवारी कोरोनाच्या 10 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 4 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देहूत आजपर्यंत 219 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 167 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 46 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूत बुधवारी कोरोनाच्या 10 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 4 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देहूत आजपर्यंत 219 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 167 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 46 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 46 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 26 रूग्णांना लक्षणे नसून 20 रुग्णांना लक्षणे आहेत. 18 रुग्णांना सौम्य तर दोन रुग्णांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.
नागरिकांनी ताप, सर्दीसह अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा. सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांनी मास्क ओला होऊ नये याची खबरदारी घ्यावी. ओला मास्क न घालता एक अतिरिक्त मास्क जवळ ठेवावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.















Leave a Reply