Dehugaon political News : विधानसभेला दाखविलेला विश्वास नगरपंचायतच्या निवडणुकीतही देहूकर दाखवतील : आमदार सुनिल शेळके

Dehugaon political News :
विधानसभेला दाखविलेला विश्वास नगरपंचायतच्या निवडणुकीतही देहूकर दाखवतील : आमदार सुनिल शेळके

Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देहूकरांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून देहूकर हे विकासकामे प्रत्यक्षात करणाऱ्यांसोबत आहेत. देहूचा विकास यापूर्वी केला असून पुढेही चांगला विकास करून दाखवू, असे आश्वासन आमदार सुनिल शेळके यांनी देहूकरांना दिले. तसेच देहूच्या मायबाप जनतेने विधानसभेला दाखविलेला विश्वास नगरपंचायतच्या निवडणुकीत देखील दाखवतील असा आशावादही त्यांना व्यक्त केला.

देहू नगरपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज (मंगळवार) आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार, आजी-माजी पदाधिकारी, महिला-भगिनी, हितचिंतक, सहकारी,नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकी पूर्वी जे बोललो होतो ते आम्ही करुन दाखवलं आणि यापुढेही करुन दाखवणार. खोटी आश्वासने देऊन दिशाभूल कधी केली नाही. देहुच्या मायबाप जनतेने विधानसभेला दाखविलेला विश्वास या नगरपंचायतच्या निवडणुकीत देखील दाखवून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,असे आवाहन यावेळी आमदार शेळके यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *