Dehugaon political News: शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करून देहूचा कायापालट करू : खासदार श्रीरंग बारणे

Dehugaon political News: शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करून देहूचा कायापालट करू : खासदार श्रीरंग बारणे

देहू नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचा खासदार बारणे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ


Pckhabar- देहू नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने निष्कलंक तरूण उमेदवार दिले आहेत त्यांना शहर हिताचे व्हिजन आहे .त्यामुळे मतदाराने शिवसेना उमेदवारांना पसंती देऊन त्यांना विजयी करावे. शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करून देहूचा कायापालट केला जाईल, असे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.

देहू नगरपंचायतची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज मंदिरा समोर खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नारळ वाढवून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शनिवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी खासदार बारणे म्हणाले ,शिवसेना पक्षाने देहूगावच्या विकासाला या पूर्वी ही प्राधान्य दिले आहे. देहू नगर पंचायत व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला मुख्यमंत्री, नगर विकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व नगरपंचायत केली. तसेच नगरपंचयाती साठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्या मुळे देहूत विकास कामे झाली. या पूर्वी ही मी देहूच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे.

देहूचे नागरिक हिंदत्वाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करून देहूचा कायापालट केला जाईल. प्रलंबित कामे मार्गी लावली जाईल, देशभरातून देहूत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी प्राधान्य दिले जाईल. त्याच बरोबर शिवसेनेने चांगले तरूण उमेदवार दिले आहेत. त्यांना देहूच्या विकासाचे ध्येय आहे. त्यामुळे मतदार शिवसेना उमेदवारांना पसंती देतील, येणाऱ्या कालावधीत शिवसेनेच्या माध्यमातून विकासात्मक कामे करण्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिली.

या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेंद्र खांडभोर,शिवसेनेचे जेष्ठ नेते भारत ठाकूर, युवासेना जिल्हा विस्तारक अनिकेत घुले, संजय महाराज मोरे, जालिंदर महाराज काळोखे, जिल्हा महिला संघटिका शैलाताई खंडागळे, देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे, शिवसेना नेते रमेश हगवणे, प्रशांत भालेकर, तालुका समन्वयक रमेश जाधव, तळेगाव शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे, राजेंद्र काटे, संजय आहेरकर, युवासेना संघटक गणेश मोरे, देहू शहर महिला संघटिका सुनंदाताई ढमाले, ज्योतिताई टिळेकर, अक्षदा कंद, मंगलताई लगाडे, बाई केदारी, नारायण काळोखे, गौतम हाटाळे, मयूर देवकर, चंद्रकांत जाधव, अभिजीत कंद, विशाल दांगट, बाळा भालेकर, शशिकांत सप्पागुरु आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *