Wakad Crime News : अबब… आयकर विभागाची भिती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची पावणे दोन कोटींची फसवणूक

Wakad Crime News : अबब… आयकर विभागाची भिती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची पावणे दोन कोटींची फसवणूक


Pckhabar- रिलायन्स लाईफ इन्श्युरन्स कंपनीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवले. बँक खात्यावर जास्त पैसे झाल्याचे सांगून आयकर विभाग, क्राईम ब्रँच पोलीस विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाकडून वेगवेगळ्या कारणावरून तब्बल 1 कोटी 85 लाख रूपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. हा धक्कादायक प्रकार 2014 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आप्पासाहेब पांडुरंग मिठारी (वय-63, रा. कृष्णकुंज निवास, पाचपीर चौक, कोकणेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिष मेहता, संजय कुलकर्णी, गणेश ठाकूर, पियुष, अनिकेत, विलास शाखापुरे, नरेंद्र प्रसाद यादव, सतिश पाटील, संतोष रायकर, राहूल सावंत, प्राची, श्रृती आग्रवाल, हरिष रेड्डी, सदाशिव रामचंद्र पाटील (रा. घाटकोपर, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी 2014 मध्ये संपर्क साधला होता. अ‍ॅगॉन रिलीगिअर लाईफ इन्श्युरन्स, रिलायन्स लाईफ इन्श्युरन्स या कंपनीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे अमिष दाखविले. इन्श्युरन्सची बनावट कागदपत्रे बनवून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या बँक खात्यावर जास्त रक्कम झाली असल्याचे सांगून आयकर विभाग, आय.आर.डी. ए ब्रॅच मॅनेजर, क्रॉईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याची भिती दाखविली. फिर्यादी यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून रोख 39 लाख 71 हजार रूपये तर विविध बँक खात्यावर, धनादेशाव्दारे 1 कोटी 45 लाख 34 हजार 66 रूपये अशी 1 कोटी 85 लाख 5 हजार 66 रूपयांची फसवणूक केली. फौजदार संगिता गोडे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *