Omicron News: ओमायक्रॉनचा पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव; एकाच दिवशी आढळले 6 रूग्ण


Omicron News: ओमायक्रॉनचा पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव; एकाच दिवशी आढळले 6 रूग्ण

पुण्यात 1 रुग्ण
Pckhabar-२४ नोव्हेंबर २०११ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. तसेच पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे.

यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. ● या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिथे त्यांचे निकटसहावासित आहेत.

● नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलासह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे.

● या तिघांच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षांचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्ष आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

• नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत.

• या सहा जणांपैकी तिथे हे १८ वर्षांखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही.

उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस पेतलेले आहेत. दोघांनी कोविंशिल्ड तर एकाने कोक्सिन

ही लस घेतलेली आहे. • हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

● पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप

आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्यामेवं लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *