Maval Accident News: भरधाव पिकअप पायी दिंडीत घुसल्याने 25 वारकरी गंभीर जखमी, दोन वारकऱ्यांचा मृत्यू

Maval Accident News: भरधाव
पिकअप पायी दिंडीत घुसल्याने 25 वारकरी गंभीर जखमी, दोन वारकऱ्यांचा मृत्यू

Pckhabar- आळंदीकडे पायी चाललेल्या दिंडी सोहळ्यात भरधाव वेगातील पिकअप घुसल्याने दिंडीतील सुमारे 25 वारकरी गंभीर जखमी झाले असून, दोन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (शनिवार) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर सातारा गावाजवळ येथे घडला.

मृतांमध्ये जयश्री आत्माराम पवार (वय 55), आणि कुसुम वाळकु यरम (वय  55 ) या महिला वारकऱ्यांचा समावेश आहे.

कोकण भागातील उंबरे, (ता.खालापूर, जि. रायगड) येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी शुक्रवारी रात्री नायगाव येथे मुक्कामी होते. आज सकाळी पुन्हा मार्गस्थ होऊन ब्राह्मणवाडी येथे चहा, नाश्त्यासाठी पोहोचण्या अगोदरच कान्हे फाट्याजवळ मुंबई बाजूकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी पायी दिंडीत घुसली.अपघातात दिंडीतील सुमारे २५ जण जखमी झाल्याची शक्यता असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमींना तातडीने कामशेत, सोमाटणे कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल दाखल करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *