
Good News : शहरात आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
Pckhabar- पिंपरी- चिंचवड शहरवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरानंतर प्रथमच आज (मंगळवार) शहरात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दिवाळीनंतर काही प्रमाणात कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी गाफील न राहता काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
दरम्यान, मंगळवारअखेर शहरातील सुमारे 25 लाख नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्कम लसीकरण झाले आहे.
शहरात 48 नवीन रूग्ण सापडले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शहरातील 2 लाख 77 हजार 173 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 387 सक्रीय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 179 रुग्ण गृह विलगीकरणात असून 203 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 284 घरांना भेटी देऊन 906 नागरिकांचे सर्वेक्षण केले. तर 24 लाख 97 हजार 285 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.











Leave a Reply