
Mumbai News : एसटी कामगारांच्या आंदोलनास देहू शहर भाजपचा पाठिंबा
Pckhabar-मुंबई येथे सुरू असणाऱ्या एसटी कामगार लढा विलीनीकरणच्या संपाला श्रीक्षेत्र देहू शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदान मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा दिला.
एसटी कामगार अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत आहेत. परंतु राज्य सरकार हा लढा दडपशाही पद्धतीने संप मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बळाचा वापर करत आहे. या सर्व कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो.
या प्रसंगी मोठ्या संख्येने एसटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी, कामगार, आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, कार्याध्यक्ष प्रकाश उर्फ रायबा मोरे इनामदार, उपाध्यक्ष सचिन काळोखे, सरचिटणीस सागर मुसूडगे इ उपस्थित होते.











Leave a Reply