बालनगरीतील कोविड सेंटर गुरुवारी कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर

बालनगरीतील कोविड सेंटर गुरुवारी कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर

Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे भोसरीतील बालनगरीच्या इमारतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. 425 बेडची क्षमता असलेले हे सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, बेडची क्षमता वाढविली जात आहे. ऑक्सिजन बेडची कमतरता नाही. भोसरी गवळीमाथा येथील एमआयडीसीच्या भुखंडावर महापालिकेने बालनगरी ही इमारत उभारली आहे. बालनगरीत 425 बेडची क्षमता असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात 80 टक्के ऑक्सीजन बेड असणार आहेत. परवापर्यंत ते कार्यान्वित होईल.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयसीयू आणि ऑक्सीजन बेड तयार केले जात आहेत. तेथे 250 बेडची क्षमता आहे. त्याचे काम वेगात सुरु आहे. काम लवकर पूर्ण करुन कार्यान्वित करण्याला आमचे प्राधान्य आहे. याशिवाय वायसीएम रुग्णालयात 30 आयसीयूचे बेड सुरु करत आहोत. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता भासणार नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.