
Sad News : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड
Pckhabar- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज (सोमवार) पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.
२६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात दाखल केल्यानंतर दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.
पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
त्यांच्या मागे चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे.











Leave a Reply