Pune News : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक
Pckhabar- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुरंदरे यांना न्यूमोनिया झाला आहे. त्यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून दिनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पुरंदरे यांची प्रकृती खूप खालावलेली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी माध्यमांशी बोलताना काही वेळापूर्वी दिली आहे.










Leave a Reply