
PMRDA Election News : पीएमआरडीएच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक विजयी
Pckhabar- पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडीए)च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून आले आहेत.
पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरली. सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीमध्ये लक्ष घातले होते. मोठे नागरी मतदार संघात (पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका) या मतदारसंघात 22 जागा होत्या. तर, 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी बुधवारी मतदान झाले. पिंपरी महापालिकेत 98 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज (शुक्रवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
पिंपरी महापालिकेतील भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, वसंत बोराटे, नगरसेविका निर्मला गायकवाड, जयश्री गावडे यांनी बाजी मारली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, डॉ. वैशाली घोडेकर हे तिघेही विजयी झाले.











Leave a Reply