Wakad Crime News : अबब… टिंडर डेटिंग ॲपवरुन ओळख झालेल्या डॉक्टरने महिलेला लग्नाच्या आमिषाने 73 लाखांना गंडविले!

ही बातमी शेअर करा.

Wakad Crime News : अबब…
टिंडर डेटिंग ॲपवरुन ओळख झालेल्या डॉक्टरने महिलेला लग्नाच्या आमिषाने 73 लाखांना गंडविले!


Pckhabar- टिंडर डेटिंग अॅपवरुन ओळख झालेल्या आपण परदेशात डॉक्टर असल्याचे खोटे सांगून महिलेला लग्नाचे आणि भारतात येवून स्थायिक होण्याचे अमिष दाखवले. महिलेला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगुन दिल्ली विमानतळावर १ करोड रुपये असल्याने कस्टम ऑफिसरने पकडले सांगितले. हे पैसे सोडविण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, फाईन, जी.एस.टी आदी कारणे सांगून महिलेची तब्बल 73 लाख 59 हजार 530 रूपयांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना
जुन २०२१ ते दि. १३/०७/२०२१ या कालावधीत घडली.

याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉट्सअप नं. ३४६३१३८९१३५ (सिध्दार्थ रावी), हॉट्सअप नं. ९०५३५८१८५७८७ (जेनी रवी)बँक अकाउंट नंबर युनियन बैंक ऑफ इंडीया, ६२६७०२०१०००७५२१. बैंक ऑफ बडोदा ४२६९०००००१२० कॅनरा बैंक ८८८२२२५०००९४२७ भारतील बँक ३०९०१०६०६६०३. युको बँक –२३६३०११००८८५७९ सेंट्रल बैंक ५११६३८४६६०यूको बैंक – २३६३०११००९०८३१, २३६३०११००८७६२६ तुको बैंक, २३६३०११००८७४५९ युनियन स्टेट बैंक ऑफ इंडीया, ३५०७२२०१००००१३०, सेंट्रल बैंक ३८८७२८९६१४., ४०२१९३३३९६ कॅनरा बैंक, ९४३३२२२२२८ आयसीआयसीआय, ३५२२०१५०१५७६, सेंट्रल बैंक, आयसीआयसीआय, २१३८०१५०१२०७ यूको बैंक २ ३६३११००८०६२६, युको बैंक -२१३८०१५०१२०७ खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची टिंडर डेटिंग अॅपवरुन प्रोफाईल धारक S Ravi ३४ त्याचा
याच्याशी ओळख झाली. आरोपीने आपण डॉक्टर असल्याचे महिलेला सांगितले. त्यानंतर महिलेचे व आरोपीचे व्हॉट्सअपवरून संभाषण होऊ लागले. आरोपीने महिलेचा आपण परदेशात वास्तव्यास असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. महिलेला लग्न करण्याचे व भारतात येवून स्थायिक होण्याचे अमिष दाखवले. फिर्यादी यांना भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगुन दिल्ली विमानतळावर सोबत १ करोड रुपये असल्याने कस्टम ऑफिसरने पकडले सांगितले. फिर्यादी यांना विश्वासात घेवून ती सोडविण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, फाईन, जी.एस.टी. तसेच इतर अनेक टॅक्सची कारणे सांगुन वेगवेगळे बॅक अकाऊंट नंबर देवून त्यावर एकुण 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे.

वाकड पोलीस तपास करत आहेत.


ही बातमी शेअर करा.