Sangvi News : डॉक्टर, मराठी कलाकार व महिला शिक्षकांच्या हस्ते शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्या देवीची आरती

ही बातमी शेअर करा.

Sangvi News : डॉक्टर, मराठी कलाकार व महिला शिक्षकांच्या हस्ते शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्या देवीची आरती

शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळातर्फे डॉक्टर व कलाकारांचा कोरोना योद्धा म्हणून विशेष गौरव
Pckhabar-जुनी सांगवीतील शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त औंध जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शर्मिला गायकवाड, मराठी अभिनेता सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता देशमुख आणि अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या महिला शिक्षकांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

 डॉक्टर व मराठी कलाकारांचा शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळाच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून विशेष गौरविण्यात आले. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव, शिवराज शितोळे, तनया राव, तेजल कोळसे पाटील, मुख्यध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बांठिया, प्रिया मेनन, आशा घोरपडे, नीलम पवार, तसेच अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

      अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांनी यावेळी बोलताना सांगितले, की कोरोना काळात आपण सुरक्षिततेच्या कारणास्तव घरात थांबून प्रशासनाला सहकार्य केले. दरम्यान, या कालावधीत डॉक्टर व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना, तसेच इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचार केले. याबरोबरच आपण घरामध्ये असताना टीव्ही मालिकांच्या माध्यमातून आपले मनोरंजन करण्याचे काम कलाकारांनी केले. त्यासाठी कोरोनाची काळजी घेत घराबाहेर पडून चित्रीकरण केले. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून मराठी अभिनेता सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता देशमुख व औंध जिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शर्मिला गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.


ही बातमी शेअर करा.