संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी अर्थतज्ञ डॉ.अभय टिळक

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या  विश्वस्तपदी अर्थतज्ञ डॉ.अभय टिळक
 Pckhabar- लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त पदी अर्थतज्ञ डॉ. अभय टिळक यांची निवड झाल्याचे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

मावळते प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पालखी सोहळा प्रमुख या पदावर डॉ. टिळक यांनी यापूर्वी कामकाज पाहिले आहे. आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *