Dehu News : देहू परिसरात गणेश मूर्ती संकलनाला प्रतिसाद

ही बातमी शेअर करा.

 

Dehu News : देहू परिसरात गणेश मूर्ती संकलनाला प्रतिसाद
Pckhabar- देहूगाव परिसरात मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन करण्यात आले.

इंद्रायणी मातेच्या आणि पर्यावरण रक्षणार्थ तसेच कोरोना विषाणू चा प्रभाव पाहून आपण केलेल्या सहकार्याबद्दल तसेच देहू नगरपंचायत प्रशासन व देहूरोड पोलिस स्टेशन यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माळीनगर देहू येथे संयोजक श्री. मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल शहराध्यक्ष भाजप देहू शहर, संभाजी बाळासाहेब टिळेकर मा. उपाध्यक्ष युवा मोर्चा मावळ तालुका, ॲड. प्रफुल्ल टिळेकर सरचिटणीस पुणे जिल्हा भाजप, संदिप दिवाणराव परंडवाल अध्यक्ष ओबीसी सेल यांच्या वतीने घरोघरी जाऊन श्री गणेश मूर्ती संकलन करण्यात आले.

हे करत असताना प्रशासनाचे सर्व नियम पाळून संकलन करण्यात आहे या सर्व उपक्रमात आम्हाला सर्व समस्थ ग्रामस्त माळीनगर, समर्थनगर, बोडके वाडी, एकतरा सोसायटी, गाथा आरंभ सोसायटी, गुलमोहर सोसायटी, अभिलाषा पार्क, अरूण्या सोसायटी, इंद्रायणी वाटिका सोसायटी आपण सर्वांनी दाखविलेल्या उस्फुर्त प्रतिसाद बद्दल सर्वांचं मनपुर्वक आभार मानले.

संकलन रथाचे पूजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. पंडित मोईकर तसेच पंचायत समिती सदस्य श्री. सुहास गोलांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले याप्रसंगी संदीप टिळेकर, युवा नेते अनिरुद्ध काळोखे, प्रभू महाराज वसेकर, युवा नेते रूचिर टिळेकर, सुयोग टिळेकर, विकास ऊर्फ पंपू टिळेकर, महेश टिळेकर, संतोष टिळेकर, बाबासाहेब टिळेकर, मच्छिंद्र बागव, रवींद्र बागव, मुरली टिळेकर, रवींद्र काळोखे, आबा टिळेकर, अंकुश टिळेकर, विशाल परंडवाल, तेजस परंडवाल, दिनेश विधाटे, शिवलिंग करवीर, सोमा शेळके, प्रविण कांबळे आदी उपस्थित होते.

 


ही बातमी शेअर करा.