Akurdi News : माकपची इंधन, घरगुती गॅस दरवाढी विरोधात भर पावसात निदर्शने
Pckhabar-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यानी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीचा निषेध करत आकुर्डी येथे भरपावसात निदर्शने केली.
या निदर्शनाचे नेतृत्व गणेश दराडे, सतीश नायर, अपर्णा दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, शेहनाज शेख, अमिन शेख, सचिन देसाई, स्वप्निल जेवळे, शैलजा कडुलकर, सुनीता तोरखडे, सुनीता कनोजिया, मेहमुदा गोवे, सुनंदा बिर्हाडे, मंगल डोळस, अविनाश लाटकर, किसन शेवते, यल्लमा कोलगवे, रंजिता लाटकर आदी कार्यकर्त्यानी निदर्शनात सहभाग घेतला.
माकपच्या वतीने तहसीलदार गीता गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील आणि औद्योगिक सर्व नागरिकांचे मोफत आणि प्राधान्याने लसीकरण पूर्ण करा., वसाहतीतील सुमारे इ एस आय योजनेतील सर्व 9 लाख श्रमिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी औद्योगिक आस्थापनाच्या सहकार्याने पूर्ण लसीकरण करा., कोरोनाग्रस्त रुग्णांवर सर्व औषधे, इंजेक्शन सहित सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करावेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यसेवा आणि रुग्णालये उपलब्ध करा, सर्व कंत्राटी आणि मानधनावर काम करणार्या नर्सेस, आया, वॉर्डबॉय, ड्राइवर सह आरोग्य कर्मचार्यांना शासकीय सेवेत वर्ग करा. पेट्रोल डिझेल वरील केंद्र राज्य सरकारचे अंदाजे 27 टक्के कारभार कमी करून मूळ किमतीवर जीएसटी करप्रणाली सुरू करा.
इंजिनीअरिंग, बांधकाम, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, रसायन, घातक, ज्वलनशील उत्पादनातील कारखान्यांचे दरमहा सेफ्टी ऑडिट करा, गुणवत्ता,सुरक्षितता या बाबतीत सरकारी अधिकाऱ्यांनी वेळेवर ऑडिट करून त्या सर्व कंपनीचे सेफ्टी संदर्भातील तपशील इंटरनेटवर उपलब्ध करा, MIDC/PMRDA यांच्या कार्यालयात लेबर आयुक्त, सुरक्षा संचालक यांनी संमत केलेले अधिकारी कामगारांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी नेमा, त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करा.
त्यामुळे संपूर्ण देशात स्वस्त आणि एकाच दराने इंधन विक्री होईल. इंजिनीअरिंग, बांधकाम, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, रसायनघातक, ज्वलनशील उत्पादनातील कारखान्यांचे दरमहा सेफ्टी ऑडिट करा, गुणवत्ता, सुरक्षितता या बाबतीत सरकारी अधिकार्यांनी वेळेवर ऑडिट करून त्या सर्व कंपनीचे सेफ्टी संदर्भातील तपशील इंटरनेटवर उपलब्ध करा.










Leave a Reply