Chinchwad Crime News: सहा लाखाच्या खंडणीसाठी मेडीकल व्यावसायिकाचे अपहरण

 

Chinchwad Crime News: सहा लाखाच्या खंडणीसाठी मेडीकल व्यावसायिकाचे अपहरण
पाच जण गजाआड
Pckhabar- पोलिस असल्याचे भासवत मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण करून सहा लाखांची खंडणी मागणा-या पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक
केली. तसेच, व्यापा-याची सुखरूप सुटका केली. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

अशोक बेलिराम आगरवाल (वय ५३, रा. विकासनगर, किवळे) यांनी फिर्याद दिली
आहे. सिद्धार्थ भारत गायकवाड (वय ३२), प्रीतेश बबनराव लांडगे (वय ३०),
राहुल छगन लोंढे (वय २४), प्रकाश मधुकर ससगाणे (वय ३१), कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे (सर्व रा. वाकड) यांच्यावर अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आगरवाल यांचे डांगे चौकात स्पंदनमेडीकल या नावाने दुकान आहे. मंगळवारी दुपारी आगरवाल मेडीकलमध्ये असताना आरोपी मेडिकलमध्ये घुसले. त्यांनी कपाटातील एमटीपी कीट हे औषधाचे पाकीट व दोन फायली घेतल्या. पोलिस असल्याचे भासवत या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्वांना येरवडा जेलची हवा खावी लागेल, अशी
भीती दाखवली आणि आगरवाल यांना जबरदस्तीने त्यांच्या वॅगनर मोटारीत
बसविले. दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे
मारण्याची धमकी दिली. एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची
मागणी केली. या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलिसांना फोन लावून विचारपूस केली. त्यांनी आमचे असे कोणीही पोलिस आले नाहीत असे सांगितले. तसेच या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी फौजदार अशोक जगताप आणि विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले. मात्र, त्यांनी पाठलाग करून चार  जणांना पकडले. त्यानंतर मोटारीतील आगरवाल यांची सुटका केली. तीन आरोपी पसार झाले होते. त्यापैकी एकाला रात्री अटक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *