Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा, सोमवारपासून रात्री सात वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार

Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा,
सोमवारपासून रात्री सात वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार

Pckhabar- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील सर्व दुकाने आणि मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्री सात वाजेपर्यंत दुकानं आणि मॉल सुरु राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *