Pimpri News : ‘एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा’; सहारा वृद्धाश्रमाला 22 ब्लँकेट, 22 सोलापूर चादर वाटप

ही बातमी शेअर करा.

Pimpri News : ‘एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा’; सहारा वृद्धाश्रमाला 22 ब्लँकेट, 22 सोलापूर चादर वाटप
Pckhabar- शेअरिंग हॅपिनेस फाउंडेशन आणि टाटा मोटर्स मित्रपरिवार यांच्यातर्फे कुसवली तालुका मावळ येथील सहारा वृद्धाश्रमाला 22 ब्लँकेट आणि 22 सोलापूर चादर चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सहारा वृद्धाश्रमाची संचालक विजय जगताप यांनी कोरोना नियमांचे पालन करत वृद्धाश्रमाच्या गेटवर वरील साहित्याचा स्वीकार केला. याप्रसंगी श्रीकांत कदम यांनी टाटा मोटर्स ची संस्कृती प्रमाणे आणि शिकवणीप्रमाणे समाज्याचे आम्ही देणे लागतो त्यापैकी आज काहीना काही फुलं न फुलाची पाकळी याठिकाणी दान करीत आहोत. तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुणवंत कामगार महेंद्र गायकवाड यांनी केले.

सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण कांबळे यांनी केले या कार्यक्रमाला कडू बाळ शिंदे, महेश बारबंद, अरुण भोसले इत्यादी सभासद हजर होते.


ही बातमी शेअर करा.