Pimpri News :  ‘वायसीएम’मध्ये ऑक्सिजनची गळती; आयुक्तांची घटनास्थळी धाव

 

Pimpri News :  ‘वायसीएम’मध्ये ऑक्सिजनची गळती; आयुक्तांची घटनास्थळी धाव
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आज (बुधवारी) ऑक्सिजन गळती झाली. टँकरमधून ऑक्सिजन प्लांटमध्ये टाकताना सेफ्टी वॉल तुटल्यामुळे ऑक्सिजनची गळती झाली. यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आयुक्त राजेश पाटील यांनी वायसीएममध्ये धाव घेतली.

पिंपरी संत तुकारामनगर येथे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी महापालिकेकडून ऑक्सिजन पुरवठादारांकडून ऑक्सिजन घेतला जातो. टँकरमधून ऑक्सिजन आणून ऑक्सिजन प्लांट, जम्बो सिलेंडरमध्ये ऑक्सिजन टाकला जातो.

टँकरमधून  प्लांटमध्ये  लिक्विड ऑक्सिजन टाकला जात होता.  त्यावेळी टँकरचा सेफ्टी ऑल खराब झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती झाली. त्यानंतर टँकरचा पंप बंद केला. तो दुरुस्त करुन पुन्हा ऑक्सिजन प्लांटमध्ये सोडण्यात आला.

दरम्यान, आयुक्त राजेश पाटील म्हणाले, साडेसातच्या सुमारास वायसीएम येथील एका टाकीमध्ये एलएमओ भरला जात होता, तेव्हा टाकीच्या दाबात चढ-उतार झाल्यामुळे दबाव कमी होता. जास्तीत जास्त दाब चालविण्यासाठी व सोडण्यासाठी असलेले टँकरचा सेफ्टी ऑल खराब झाला. सुरक्षित वाल्व्ह त्वरित
बसवण्यात आला. तथापि, ही टाकीची सफाई यंत्रणा असल्याने टाकीमधून कोणतेही नुकसान झाले नाही किंवा प्रत्यक्ष गळती झाली नाही. वायसीएममध्ये 300 इनडोअर रूग्ण आहेत आणि त्यात दीड तासाचा अनेक पट बॅकअप आहे. ऑक्सिजन सुविधेचे सीओईपीच्या बायोमेडिकल विभागाने ऑडिट केले होते, सर्व रुग्ण व टाक्या सुरक्षित आहेत.