Alandi News : पालखी सोहळा बसने व्हावा : आळंदी ग्रामस्थांची मागणी

Alandi News : पालखी सोहळा बसने व्हावा : आळंदी ग्रामस्थांची मागणी

भाविक, वारकरी, स्थानिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य
Pckhabar-संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे सावट आहे. यामुळे  यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांत सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरीने आळंदी ते पंढरपूर व्हावा अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी केली आहे. भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांचेच्या आरोग्याचे दृष्टीने बसने पालखी सोहळा घेऊन जाणेच महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांचे वतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कुर्‍हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले.

 सन 2020 मध्ये सुरू झालेले कोरोना संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी पंढरपूर पालखी सोहळा नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षभरात कोरोनाने मोठे संकट लोकांसमोर उभे केले आहे. यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. अजून पुर्णपणे संकट संपलेले नाही. कोरोना गर्दीत जास्त वाढत असल्याने गर्दी नियंत्रित राहावी, यासाठी तसेच पालखी सोहल्यामुळे कोरोना संकट वाढू नये दक्षता म्हणून यावर्षीही शासनाने आळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने मोजक्याच भाविकांत साजरा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पायी वारीचा हट्ट सुरू आहे. तो सोडावा तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीच विचार करून कोरोना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे. सोहळा बसने ये-जा करताना प्रथा परंपरांचे पालन व्हावे, प्रस्थान नंतर व परत वारी हून आल्यानंतर मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षीप्रमाणे करून आषाढी वारी सोहळा  मोजक्याच लोकांत शासनाचे कोरोना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा यासाठी शासनाकडे मागणी निवेदनातून करण्यात आल्याचे आळंदी ग्रामस्थांचे वतीने ज्ञानेश्वर कुर्‍हाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *