Wakad Crime News : म्युकर मायकोसिस आजारावरील औषधांचा काळा बाजार; चौघांना ठोकल्या बेड्या, एक जण फरार
Pckhabar-म्युकर मायकोसिस आजारावरील औषधांचा काळा बाजार करून चढ्या किंमतीत विक्री करणाऱ्या चार जणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण फरार आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. आरोपींकडून 1 लाख 15 हजार 442 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गौरव जयवंत जगताप (वय-31, रा. काळा खडक), अमोल अशोक मांजरेकर (वय-39, रा. पाषाण), गणेश काका कोतमे (वय-32, रा. जनता वसाहत, पुणे), ममता देवरावजी जळीत (वय-24, रा. रूपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बसवराज (रा. सोलापूर) हा फरार आहे. अन्न औषध प्रशासन विभागाच्या भाग्यश्री अभिराम यादव ( वय-44, रा. धनकवडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी D Liposomol Amphotericin-B Injection हे म्युकर मायकोसिस आजारावरील औषधांचा काळा बाजारात चढ्या दराने विक्री केली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी वाकड येथील काळा खडक येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून D Liposomol Amphotericin-B Injection वरील 3 इंजेक्शन सह 1 लाख 15 हजार 442 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाकड पोलीस तपास करत आहेत.









Leave a Reply