Maharashtra News : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाइन बैठक संपन्न

 

Maharashtra News : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाइन बैठक संपन्न
Pckhabar- सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या समन्वयकांची ऑनलाइन बैठक पार पडली. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतरची ही दुसरी महत्त्वाची बैठक होती. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते.

१)कोपर्डी प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
२)मराठा आरक्षणाचा प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तो पर्यंत राज्यतील सर्व नोकर भरती स्थगित करा.
३)मराठा समाजाला ५०% च्या आतील कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यात यावे.
४)सारथी संस्थेला स्वायत्तता देण्यात यावी व प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेच्या शाखा निर्माण करा
५) सारथी मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी.
६)अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी देण्यात यावेत.
७)मराठा समाजाच्या विकासासाठी ५० हजार कोटी निधी देण्यात यावा
८)प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करावे .
9) मराठा समाजा तील गोरगरीब जनतेला स्वतंत्र घरकुल योजना सुरू करण्यात यावी

असे निर्णय घेण्यात आले. या सर्व मागण्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील समन्वयक पाठवणार आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज गनिमिकाव्याने मोठे आंदोलन करेल. त्या वेळी सरकारला काम करणे अवघड होऊन जाईल व राज्यकर्त्यांना फिरून दिले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

या बैठकीला अनिरुद्ध शिवाजी शेलार, विजय गोपाळराव पवार, चेतन उद्धव शेवाळे, राजन घाग, दिलीप पाटील, रुपेश मांजरेकर, गणेश काटकर, प्रफुल्ल पवार, संदीप निर्मळ, सुधीर सोनवणे, युवराज सूर्यवंशी, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *