Delhi News : 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

Delhi News : 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

Pckhabar-  कोरोना संकट मोठे असून या संकटातून देश मार्ग काढत आहे.
21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस आणि दिवाळीपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
– आता लसीकरणाची १०० टक्के जबाबदारी केंद्राची
– केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार
– केंद्राच्या नियोजनानुसार लसीकरण सुरु
– १८ वर्षांवरील सगळ्यांचं मोफत लसीकरण, केंद्र लस मोफत देणार
– १ मेपासून लसीकरणाचं २५ टक्के काम राज्यांवर सोपवलं
– राज्यांजवळील २५ टक्के कामंही केंद्र करणार
– जानेवारी ते एप्रिलपर्यंत राज्यांना लसी पोहोचवल्या
– २१ जूनपासून १८ वर्षांवरील नारगिकांचं लसीकरण
-भारतात नेझल लसींच्या निर्मितीवर भर
-परदेशातून लस भारतात आणण्यावर भर
– कोरोना लसींचा पुरवठा वाढणार
– देशात कोविड योद्ध्यांचं लसीकरण पुर्ण
-परदेशी कंपन्यांसोबत करार केले
– जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील. २०१४ नंतर लसीकरणाचा वेग वाढवला.
– देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान
– देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
– कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली
– कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवचं
– एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती
– देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण
– जगात भारत लसीकरणात मागे नाही
– कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा
– ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत घेतली
– मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती