Pimpri News : अपघातात दोन्ही किडण्या निकामी झालेल्या मुलाला आई देणार जीवनदान !

Pimpri News : अपघातात दोन्ही किडण्या निकामी झालेल्या मुलाला आई देणार जीवनदान !
प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सव्वा दोन लाखांची मदत
Pckhabar- अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश अभिमान अहिवळे या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी भोसरीतील श्रीराम विद्या मंदिर व जिजामाता विद्यालयातील आजी व माजी विद्यार्थी, शिक्षक मित्र परीवार, भोसरी, सातार्‍यातील महावितरणचा कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी  2 लाख 36 हजार 112 रूपये रकमेचा धनादेश गणेशची बहिण व आई यांच्याकडे सुपुर्द  केला.

गणेशचा काही दिवसांपुर्वी अपघात झाला होता. या अपघातात  त्याच्या दोन्ही किडण्यांना गंभीर इजा झाली. त्यामूळे त्याला त्याच्या आईची किडणी देण्याचे ठरले. त्याच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी बराच खर्च येणार असल्याने व गणेशची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज होती. मदतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन  श्रीराम विद्या मंदिर व जिजामाता विद्यालय भोसरी या शाळातील आजी व माजी विद्यार्थी , तसेच शिक्षक मित्र परीवार भोसरी, सातार्‍यातील महावितरणचा कर्मचारी वर्ग, अनेक अपरीचित दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली. 2 लाख 36 हजार 112 रूपये रकमेचा धनादेश गणेशची बहिण व आई यांच्याकडे सुपुर्द  केला.

या मदतीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून धीरज टेकवडे, सूरज टेकवडे व विनोद भंडारे, शिक्षक प्रतिनीधी म्हणून सूनिता भोसले, सिमा राजगुरव-शिंदे,  पोपट नाईकनवरे, जिवलग मित्र परीवार, जिव्हाळा परिवाराच्या सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले. जिव्हाळा परीवाराचे कार्यवाहक लालासाहेब जगदाळे यांनी सर्व दात्यांचे विशेष आभार मानले.